तुझी गुण कथा ऐकता प्रेमळे

        गंगा-तरंग
   (अर्थात- अभंग-शतकावलि )
      नाम-प्रताप व चित्तानुताप
तुझी गुण-कथा ऐकता प्रेमळे ! । बोधाग्नि प्रज्ज्वळे भाविकाचा ॥
पूर्ण शांति नांदे तयाचिये घटी । पाप उठाउठी दुरी जाय ॥
अखंडीत वृत्ति राही समाधानी । जागृती स्वपनी प्रभू ध्याई ॥
तुकड्यादास म्हणे ऐसे तुझे नाम । श्रृति निगमागम वर्णिताहे ॥