तुझीया नामासी लागले जे धीर

तुझिया नामासी लागले जे धीर । विसरले घर देह-भाव ॥
तेचि धन्य झाले संसारी निमाले । निरसोनि गेले संदेहासी ॥
कर्म धर्म-त्यांना उरला गोविंद । लागलासे छंदू लक्षालक्षी ॥
तुकड्यादास म्हणे मुक्तिचे आगर । ज्ञानाचे तयापाशी ॥