रोज रोजनिशी लिहावी हातानी

 रोज रोजनिशी लिहावी हातांनी । आजचियां दिनी काय केले ? ॥
पाप किती केले ? पुण्य कार्य झाले ? पाहिजे भोगिले  कोणी आता ? ॥
कोण ते येतील भोगाया दुसरे ? । ऐसिया विचारे काळ  जावा  ॥
तुकड्यादास म्हणे कराया विचार । विचरे सुधार पावे जिवा ॥