संत गर्जुनिया सांगे ।

संत गर्जुनिया सांगे । जावे त्यांच्या मागे मागे ।।
तेथे ठेवूनी विश्वास । चित्ती करावा अभ्यास ।।
पाळू नये आळसासी । मिती निद्रा भोजनासी । ।
तुकड्या म्हणे ऐसे करा । देव होत असे सोयरा ।।