आम्ही केले काय पाप कोटी जन्म

आम्ही केले काय पाप कोटी जन्म । म्हणोनिया नाम नये मुखी ? ॥
तिळभरी नाही संतांची संगति । आयुष्याची रिती वेळा गेली ॥
सदा सर्वकाळ पोटाची जाचणी । दिसे जनी वनी संसाराचि ॥
व्रुत्ति नाही स्थीर जरा देवा ! पायी । सदा हायी हायी इंद्रियांची ॥
तुकड्यादास म्हणे भले थोरविलो । आलो तैसे गेलो मृत्युमुखी ॥