चला चला वाटे चला ।

चला चला वाटे चला । मार्ग साधारे आपुला ॥
नका पाहू उगी दुगी । रहा जनात निःसंगी ॥
वेळ जातो आयुष्याचा । तेणे घात होय साचा ॥
तुकड्या म्हणे आपण दीन । पहा आपुले वर्तन ॥