क्षुद्राचेही क्षुद्र केले नारायणे

क्षुद्राचेही क्षुद्र केले नारायणे । भिक्षा-पात्र जिणे हाती आले ॥
नाही उपकार केला तिळभरी । राबविले घरी दारी जन ।।
अहोजी दातारा! आम्हा ऐशा मूढा । टाकावया खड्डा केला कोठे ? ॥
तुकड्यादास म्हणे घ्यावयासी हाक । तू एक नायक राहिलासी ॥