सांभाळोनि वाट चला ।

सांभाळोनि वाट चला । नका करू हो गलबला ॥
मार्गी चोर आड येती । त्यांचे पहारे फिरती ॥
झणी सापडाल कोठे । खाल कामाचे झपाटे  ॥
तुकड्या म्हणे नामी रंगा। अंगी भरोनी विरागा ॥