अवघड साधने होती तिन्ही यूगी

       (संतास प्रार्थना )
अवघड साधने होती तिन्ही युगी । कलियुगालागी सुलभ केली ॥
करोनी सुलभ    ठेवियेली    संती । परी नाही मति घोळ घेई ॥
काय हे दुर्भाग्य लाधले आम्हांसी ?। गावया प्रभूसी ने घे मन ॥
तुकड्यादास म्हणे करा काही कृपा । संत मायबापा ! शरण आलो ॥