वळण द्यावे इंद्रियांसी ।

वळण द्यावे इंद्रियांसी । राहण्या स्थिर चित्तापाशी ॥
चित्ता लावावे संधानी । आत्म - रंगाच्या रंगणी ॥
रंग लागे आत्मयाचा । तोचि दिवस भाग्याचा ॥
तुकड्या म्हणे ऐसे झाले । तरीच पुण्य हे फळले ॥