शुद्ध करा आधी मनाचा विचार
शुद्ध करा आधी मनाचा विचार । अप्यासाचा तार लावोनिया ॥
क्षणोक्षणी का पश्चाताप मनी । आशापाशातुनी कैसा जाई ? ॥
सदग्रंथ-वाचन वैराग्य-चिंतन । अभ्यासाचे ध्यान ठेवा ध्यानी ॥
तुकड्यादास म्हणे सेवावा एकांत । त्याचि विचारात दुढ व्हाये ॥