शोधाये आपुले अंतर सर्वदा


 शोधाये आपुले अंतर सर्वदा । काम क्रोध कदा येती काय ? ॥
आले हे पाहोनी विचारावे मनी । वैराम्य-शुळानी वार द्यावा  ॥
ठग्रूप आत्मयाचे प्रगल्भावे । बाहेर काढावे काम क्रोधा ॥
तुकडयादास म्हणे सूक्ष्म यांचे बीज करावे काबीज ज्ञानशास्त्रे ॥