तुझीया पायाची धरूनिय आस
श्रीगुरु-प्रार्थना
तुझिया पायाची धरुनिया आस । जाहलो उदास माया-मोही ॥
तारावे मारावे है तुझ्या स्वाधीन । राहो जावो प्राण तुझ्या पायी ॥
जीवीचा जिव्हाळा, गळ्याचाही गळातू एक दयाळा!सद्गुरुराया ! ॥
तुकड्यादास म्हणे ओसरो ही वृत्ति । असो नसो मति पायी ठेवा ॥