तुझे रूप डोळा पाहावे

तझे रूप डोळा पहावे ही आस ।। लागली नेत्रास सदाकाळी॥
अगा सद्गुरुराया ! कृपेच्या सागरा ! । भेट दे पामरा येवोनिया ॥
पाहो जाता तुज मार्ग नाही ठावो । इतुका संदेहो फेडी माझा ॥
तुकड्यादास म्हणे सुखाचिये सुख । पहावे हे मुख नित्य नवे।।