शंका शंकी कल्प वाढे


शंका शंकी कल्प वाढे । पाप विकल्पा येवढे ॥
जेथे मन असे शांत । तेथे पुण्याचा एकांत ॥
पापपुण्य मनी राहे । फळ जाचताचि पाहे ।|
तुकड्या म्हणे समजा काही मना शांतवा गुरु-पायी॥