काय उतराई होऊ गुरुमाये

गुरु कृपानंद
काय उतराई होऊ गुरुमाये ! । अभ्याग्यासी पाय दावियेले ॥
जन्मजन्मांतरी दुरावली भेट । होउनिया धीट पायी आलो ॥
राहो हा संकल्प तुझ्या नाम-मंत्री । येवीण येर्त्री धाडू नको ॥
तुकड्यादास म्हणे उदयता भाग्य । पळोनी दुर्भाग्य नामी ठेलो ॥