जे जे दिसे दृष्टीपुढे ।

जे जे दिसे दृष्टीपुढे । ते ते गोविंद-रूपडे ॥
ऐसे धरावे या मनी । काळ सारावा चिंतनी ॥
सदा एकभाव चित्ता । ज्ञानवृत्तीची समता  ॥
तुकड्या म्हणे ऐसे केले । तेचि विठ्ठली पावले  ॥