जरी नासले साधन


जरी नासले साधन । तरी होऊ नये खिन्न ॥
दुःख मनाचिया सवे । मन सुखविता सुखावे ॥
निश्चयासी राहे ठाव । तरीच पावे देवराव ॥
तुकड्यादास म्हणे । पुष्टि भेटे निश्चयाने ॥