जाणे जाणत्याच्या भाव ।

जाणे जाणत्याच्या भाव । कार्य करिता सदैव ॥
त्यासी सांगणे न लागे । चाले सज्जनांच्या मागे ॥
सत्या सत्य न्याहाळोनी । पाय टाकी कर्मस्थानी ॥
तुकड्या म्हणे तो साधक । तरे भवसागर निःशंक ॥