कोणा दुःख नोहे जगी ? ।

कोणा दुःख नोहे जगी ? । राजा रंक हो का जोगी ॥
जन्म दुःखासी कारण । दुःखे मरणा आमंत्रण ॥
कोणी रडे पैशासाठी । कोणी रडे पुत्रासाठी ॥
कोणी रडे रोगे जगी । कोणी रडे मानालागी ॥
तुकड्या म्हणे विरळे संत । न पडलेचि या पाशात ॥