सुख व्हावे वाटे चित्ता ।

सुख व्हावे वाटे चित्ता । परी नाही बुद्धिमत्ता ॥
नाही भिक्षेचीहि आशा । म्हणे  होईन बादशा  ॥
नाही रहाया झोपडी । म्हणे  व्हावी एक माडी ॥
तुकड्या म्हणे काय केले । देवालागी काय दिले ? ॥