सुखासाठी केले घर ।

सुखासाठी केले घर । तव ते झाले परद्वार ॥
नाही आमुचि वसती । आत चोरचि राहती ॥
गेली आमुची मालकी । काम क्रोध केले दुःखी ॥
तुकड्या म्हणे व्यर्थ गेले । ज्यांनी घर ना राखिले॥