वेळ आलिया प्रसंगे ।

वेळ आलिया प्रसंगे । बळे तोंड द्यावे लागे ॥
नाही तरी शीण आम्हा । संसारिकांचिया कामा ॥
जाई व्यर्थ हाकाहाकी । शक्ति धनाची ही फुकी ॥
तुकड्या म्हणे लाभ नाही । मृगजलाच्या प्रवाही ॥