थोड्या सुखाचिया मागे ।

थोड्या सुखाचिया मागे । जन्मवरी दुःख लागे ॥
अल्प सुख धांडोळिता । सर्व दुःखाचीच व्यथा ॥
कोणी नाही संसारीया । सुखी केली अपुली काया ॥
सुकड्या म्हणे जाणा ज्ञाने । काय फिरता आडराने ॥