काही करा कामधंदा।

काही करा कामधंदा। परी भजा या गोविंदा ॥
हात लावा व्यवहारा । मनी रंगवा श्रीधरा ॥
घरदार नका सोडू । परी नाम नका खंड़ू ॥
तुकड्या म्हणे सत्य करा । देव देईल आसरा ॥