सर्व करावे लौकिक ।

सर्व करावे लौकिक । होवोनिया सांसारिक ॥
पाप ताप हे सारूनी । आचरावे सकळ जनी ॥
जैसी वर्णजाति वसे । तैसे वागावे निगुते  ॥
तुकड्या म्हणे अहंकार । धरू नये तिळभर ॥