व्यवहारी व्यवहार ।

व्यवहारी व्यवहार । परी दूर हे अंतर     ॥
चित्त सदा देवापायी । देह संसारी या राही ॥
मनी राहोनी उदास । कर्म करावे सर्रास.   II
तुकड्या म्हणे कमल जैसे । जली असुनी न लिंपेसे ॥