आम्हा कळले ते वर्म ।

आम्हा कळले ते वर्म । भक्त भाविकांचा धर्म  ॥
काम करिता सर्वदा । भावे भजनी त्या गोविंदा ॥
हानि लाभ जे जे घडे । ते ते देती देवाकडे ॥
तुकड्या म्हणे राहती खुले । पाप पुण्या दुरावले ॥