अखंड वृत्ति ब्रह्माकार ।

अखंड वृत्ति ब्रह्माकार । तया नाही जग व्यापार  ॥
कर्म प्रारब्धा आधीन । करवी तोचि नारायण ॥
काय असेल ते घ्यावे । सदा संतुष्ट रहावे  ॥
तुकड्या म्हणे ज्ञानाग्नीने । तुटती जीवाची बंधने ॥