ज्याची विकल्पता गेली ।

ज्याची विकल्पता गेली । त्याची उपासना झाली ॥
तया लाभे ब्रह्मज्ञान । सकळ निरसोनी मान  ॥
त्याचे सर्व कर्म हरि । बोल त्याचे वेद चारी  ॥
तुकड्या म्हणे तोचि संत । लाभे तया भगवंत ॥