जाणले निश्चित वर्म

जाणले निश्चित वर्म गुरु-पायी। आस दुजी नाही जन्मोजन्मी ॥
तो माझा विसावा तो माझा विसावा । सदा जीव-भावा गाऊ त्यासी ॥
सुखदुःख दोन्ही वाहो तया पायी । भक्तिची दुहाई मागो तया ॥
तुकड्यादास म्हणे सांगू सर्व जना । अहो ! सर्व म्हणा गुरु- कृपा ॥