सद्गुरु तो माझा जीवीचा जिव्हाळा
सद्गुरु तो माझा जीवीचा जिव्हाळा । जेणे कळिकाळा मागे केले ॥
करोनिया बोध शब्द - वृष्टी ज्ञान । वाहवी अज्ञान सर्व माझे ॥
महावाक्याच्याही दावोनिया खुणा । मेळवी मेळणा संगमाच्या ॥
तुकड्यादास म्हणे धन्य धन्य गुरु । करी पैलपारू भाविकासी ॥