गुरु नव्हे रूप, गुरु नव्हे देह
गुरुचे यथार्थ स्वरूप
गुरु नव्हे रूप, गुरु नव्हे देह । गुरु नव्हे स्नेह मायिकांचा ॥
गुरु नव्हे शास्त्र, गुरु नव्हे वाणी । गुरु नव्हे ज्ञानी पुस्तकांचा ॥
गुरु नव्हे बळ, गुरु नव्हे खेळ । गुरु नव्हे चळ लोभियांचा ॥
तुकड्यादास म्हणे गुरु निर्विकार । अनुभवियाचे सार गुरु माझा ।।