तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अचळ अमळ नित्य सर्वकाळ
अचळ अमळ नित्य सर्वकाळ । ज्ञानियाचे मूळ गुरु माझा ।।
ना मरे मरणी न जन्मे जन्मुनी । न राहे राहुनी गुरु माझा ॥
करोनी अकर्ता पाही न पाहता । निर्विकल्प सत्ता गुरु माझा ॥
तुकड्यादास म्हणे धन्य त्याची लीला । आपणचि झाला सर्व काही ॥