ज्ञान हे सद्गुरु
ज्ञान है सद्गुरु ध्यान है सद्गुरु । नाम हे सद्गुरु पाहो जाता ।।
ज्ञान ध्यान दोन्ही केले कराईने । आधी नव्हते कोणे ठायी ठेले ।।
उठिला संकल्प व्हावे बहुरूपी । म्हणोनिया सोपी क्रिया केली ॥
तुकड्यादास म्हणे तोचि तो सर्वत्र । भासे सर्व क्षेत्र गुरु-रूप ।।