सुखाचे सागर आनंदाच्या राशी

अध्यात्म हरि-दर्शन
सुखाचे सागर आनंदाच्या राशी । तुझ्या पायापाशी सदा देवा ! ॥
क्षणभरी उभे राहिले चिंतने । तुटती बंधने अज्ञानाची ॥
नाम तुझे गोड ध्यान तुझे गोड । रूप है अखंड पाहो वाटे ॥
तुकड्यादास म्हणे रूप है अरूप । करोनी संकल्प पाहो आम्ही ॥