राहावेसे वाटे ऊभे महाद्वारी

राहावेसे वाटे उभे महाद्वारी । पहावी गोजिरी मूर्ति उभी ॥
आपुली आपण प्रकाशली क्षेत्री । पाहता सर्वत्री मूर्ति दिसे ॥
दिसे भासवणी लावण्याची खाणी । जागृती स्वप्नी मूर्ति दिसे ।
तुकड्यादास म्हणे झाले समाधान । शांतवले मन मूर्ति-पायी ॥