गगना ऐसी जरी घालू प्रावरण
गगना ऐसे जरी घालू प्रावरण । तरि का चांदवण होई तुम्हा ?॥
ऐसाचि पाहिला ज्ञानाचिये भरी । भक्तिचिये घरी कामे काजी॥
सर्व सत्ता ज्याची दिसे रोमरंध्री । प्रेमाच्या समुद्री झळके जैसा।
तुकड्यादास म्हणे मोठा सर्वाहुनी । भासतो भासणी छोटा जैसा ।