चुकीचीया दोषा पत्र आहो आम्ही

समुचित निर्धार
चुकीचिया दोषा पात्र आहो आम्ही । नाही तुझ्या कामी आलो देवा ! ॥
होतो गर्भवासी आळवीत तुम्हा । देवा ! तुझ्या नामा गाऊ ऐसेl
निघता बाहेर झालो मायिकांचे । विसरलो साचे नाम तुझे ॥
तुकड्यादास म्हणे झाली आठवण । म्हणोनिया मन जडले नामी ॥