तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ऐहिक वासना सोडुनीया सर्व
ऐहिक वासना सोडूनिया सर्व । आठविती देव प्रेम - भावे ॥
नेचि भक्त खरे आवडती देवा । येरांनी वाहावा भार माथा ।।
साधनांच्या पाठी लागती या युगी। तयांचिया संगी वेळ लागे ।
तुकड्यादास म्हणे आम्हांसी ना कळे । बोलती सकळे संत ऐसे ।।