जयसी आवडे ऐक्य प्रेमभक्ती

जयासी आवडे ऐक्य प्रेमभक्ति। तयाने विरक्ति हाती घ्यावी ।
जरी लागे भीक न मिळे खायासी । आपुल्या देवासी न सोडावे ॥
जरी नाही वस्त्र मिळाले शरीरा । सोडू नये धीरा धीर अंगी ॥
तुकड्यादास म्हणे पाहोनिया निष्ठा । सुखी करी वाटा देव माझा ॥