स्वकष्टे आचरे स्वधरमेची चाले

स्वकष्टे आचरे स्वधर्मेचि चाले । समाधान झाले विषयी ज्याचे l
सदा सर्वकाळ प्रभूचे भजन । शमदमी मन ज्ञान सांची  ॥
जैसी स्थिती राहे समाधान मानी । ऐसी सत्वगुरणी वृत्ति जाणा ।।
तुकड्यादास म्हणे श्रेष्ठा सदा नमी । विषयांची उर्मी  बंद झाली ॥