करावा अभ्यास एेशाचीये रिती

करावा अभ्यास ऐशाचिये रीती । धरावी संगती ऐशाचिये ॥
ऐकावे भाषण ऐशाचिये योली । डोलावेहि डोली ऐशाचिये ॥
करावा विवाद ऐसियाच्या वादी । लागावे ते नादी ऐशाचिये ।।
तुकड्यादास म्हणे ज्याचे सर्वभाव । आठवती देव सर्वकाळ ॥