आपुलिया मार्गे जावे सत्वगुने

आपुलिया मार्गे जावे सत्वगुणे । न पहावे उणे लोकांचिये ।।
प्रारब्धाच्या ओघे खेळती सकळ । जैसे त्यांचे बळ कर्मी भासे ।।
हे तो सद्गुरुराय पाहती कसोटी । लावियेली पाठी सुख दुःखे ॥
तुकड्यादास म्हणे एक अधिष्ठाण । तयासी खंडण नाही केव्हा ॥