शांतीविणे वर्म नोळखीले कोणी
शांतिविणे वर्म नोळखिले कोणी । ऋषिसंतमुनी शांति ठेली ॥
ज्ञानाचिया अंगे पाळियेली शांति । तेणे झाली माती अज्ञानाची ॥
शांतिचे शिखर वैराग्याच्या भरी । निष्कामाच्या घरी नांदतसे ।।
तुकड्यादास म्हणे धरा शांति पोटी । तुटती कपाटी कळिकाळाच्या ॥