सद्भावाची वृत्ती ठेवोनिया चित्ती
गुरुभक्त साधकास
सद्भावाची वृत्ति ठेवोनिया चित्ती । उभे व्हावे पंथी भाविकांच्या ॥
सोडोनिया लाज लौकीक लोकांची । गोडी साधनाची मनी घ्यावी ॥
नेत्री वसो ध्यान ध्यानी राहो मन । सदा हे चिंतन वसो द्यावे ॥
तुकड्यादास म्हणे करावे प्रत्यक्ष । लावोनिया लक्ष अभ्यासासी ॥