आपुली आपण ठेवा आठवण

आपुली आपण ठेवा   आठवण । रहा सावधान   संत - संगे ॥
आळवा गोविंदा मनाचिये मनी । सदा क्षणोक्षणी ठायी ठायी॥
नका भूल पावू प्रस्तुतांच्या मती । विसराल गती   मोक्षाचिये ॥
तुकड्यादास म्हणे नम्र रहा संती । सोडोनी कुमती विपयांची॥