गुरु वाक्य तेचि वेदाचे वचन
गुरु - वाक्य तेचि वेदाचे वचन । प्राण गेल्या जाण सांडो नये ॥
हृदयी स्मरावा गुरु - बोध सदा । तोडोनि आपदा मायिकांची ॥
बोधोनिया वृत्ति संपादावे ज्ञान । गुरु जीव प्राण सोडू नये ।।
तुकड्यादास म्हणे बोधे आचरावे । तेणेचि स्थिरावे वृत्ति पायी ।।