संतांची वचने ऐकावी श्रवणी

संतांची वचने ऐकावी श्रवणी । चिंतावी मननी सर्व काळ ॥
धरोनिया ध्यास आचरावे तैसे । क्षणोक्षणी दिसे बोधरूप ।
ज्ञानाची उत्पत्ति अज्ञानाचा नाश । होय समरस वृत्ति तेव्हा ॥
तुकड्यादास म्हणे दृढ धरा श्रद्धा । आळवा मुकुंदा संत-बोधे॥