तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
तिसरे प्रहरी पुण्य मुहूर्तासी
तिसरे प्रहरी पुण्य मुहूर्तासी । आठवा मानसी राम माझा ॥
करावे स्मरण सद्भावा धरोन । अगे विसरोन अज्ञानता ।॥।
तयाच्या चिंतने सुलभवे काळ । यमाचिये जाळ न बाधती ॥
तुकड्यादास म्हणे सोडा दुष्ट संग । बनोनी निःसंग अभ्यासाने ॥